बिहारच्या ड्रग्ज तस्कराला चरस साठ्यासह पकडले

मुंबई - शाळा, कॉलेजबाहेर एमडी विकणाऱ्या सरफराज लंगडा याला लाखो रुपयांच्या एमडीसह नागपाडा येथे पकडल्यानंतर अंमली पदार्थविरोधी पथकाच्या वरळी युनिटने मंगळवारी आणखी कारवाई केली. पोलिसांनी कुर्ला येथे बिहारच्या एका ड्रग्ज तस्कराला २२ लाख ६० हजार किमतीच्या चरस साठ्यासह रंगेहाथ पकडले. __ वरळी युनिटचे वरिष्ठ निरीक्षक अबूराव सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अमर मराठे, सुदर्शन चव्हाण व पथक कुर्ला एलबीएस मार्ग येथे गस्त घालत असताना पथकाला एक काळी सॅक बॅग दारूखाना घेतलेला तरुण संशयास्पद हालचाल कंपनीच्या करताना दिसला. त्यामुळे त्याला ताब्यात ५५ घेऊन चौकशी केली असता त्याने त्याचे | गुन्हा नाव विश्वनाथ राम (३२) असे सांगून कोणताही तो बिहारचा असल्याचे सांगितले. तपास पोलिसांनी त्याच्याकडील बॅगेची तपासणी विकत केल्यावर त्यात चार किलो ५२४ ग्रॅम वजनाचा चरस साठा मिळाला. त्याने हा कंपनीच्या चरस साठा मुंबईतील स्थानिक पेडलरर्सना दुसऱ्या विकण्यासाठी आणला होता. आम्ही असता अधिक तपास करीत असल्याचे अपर चोरीला पोलीस आयुक्त शिवदीप लांडे यांनी दाखल सांगितले.