कोरोनाशी लढा : राष्ट्रवादीचे आमदार-खासदार एक महिन्याचे वेतन देणार

कोरोना विषाणूच्या संकटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सामाजिक जबाबदारी स्वीकारत राज्य आणि केंद्राला आर्थिक हातभार लावण्याचा निर्णय घेतलाय. विधीमंडळातील विधानसभेचे आणि विधान परिषदेचे सदस्यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात येणार आहे. 


संसदेतील राष्ट्रवादीचे लोकसभा आणि राज्यसभा सदस्य एक महिन्याचे वेतन प्रधानमंत्री सहाय्यता निधीसाठी देतील, अशी माहिती राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी परिपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे. सदस्यांनी संबंधित धनादेश प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांच्याकडे द्यावेत, अशी माहितीही देण्यात आली आहे.
यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचे खासदारांनी दिल्ली दरबारी न जाता आहे तिथे थांबण्याचे आवाहन केले होते. सरकारला सहाकर्य करुन आवश्यक ती मदत सरकारी संस्थांना करायची आहे, अशी माहिती शरद पवारांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली होती.