<no title>

 विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रेशनिंग दुकानातून शिधावस्तूंचे वितरण करताना लाभार्थ्यांची बायोमेट्रिक पडताळणी करू नये. अशी करताच त्यांना धान्य वाटप करण्यात पडताळणी न करताच त्यांना धान्य वाटप करण्यात यावे, असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नुकतेच दिले. छगन भुजबळ म्हणाले, रास्त भाव दुकानात लाभार्थ्यांना ई-पॉस उपकरणावर बोट, अंगठा लावण्याची आवश्यकता नाही. यामुळे विषाणूचा संसर्ग टाळता येईल. तसेच रास्त भाव दुकानांवर गर्दी होणार नाही याची दक्षतादेखील घेण्यात यावी. याकरिता टोकन देऊन लाभार्थ्यांना नियोजित वेळी दुकानावर येण्याच्या सूचना देण्यात याव्यात. तसेच धान्य घेण्यास आलेले लाभार्थी ठराविक अंतर ठेवून रांगेत उभे राहतील, याचीही दक्षता रास्त भाव दुकानदारांनी घ्यावी.