बीड : पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जो तो ज्याच्या त्याच्या परीने सहकार्य करत असताना बीड जिल्ह्यातील वांगी गावच्या सखाराम शिंदेया शेतकऱ्याने देखील कोरोनाशी दोन हात करणाऱ्या पोलीस कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना शेतातील पाच क्विंटल मोसंबीचं मोफत वाटप केलं आहे. या शेतकऱ्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे
स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाजाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यासाठी एका शेतकऱ्याने शेतातील पाच क्विंटल मोसंबी मोफत वाटली. संपूर्ण देश कोरोनाशी लढत असताना या सैनिकांना 'सी' जीवनसत्व मिळावं म्हणून हे पाऊल उचललं आहे.
बीड जिल्ह्यातील वांगी शिवनी गावच्या सखाराम शिंदे या शेतकऱ्याने या शेतकऱ्यांना आपल्या शेतातील मोसंबीच्या बागेतील पाच क्विंटल मोसंबी बीड शहरातील 24 तास सेवेत असणाऱ्या दोनशे ते अडीचशे कर्मचाऱ्यांना वाटप केले आहे.
बीडकरांनी सोडला सुटकेचा निश्वास!
एकीकडे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी शेतकऱ्याने पुढे येत मदत केली आहे तर दुसरीकडे बीडकरांसाठी आणखी एक दिलासादायक बातमी आहे. कारण लातूर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या तबलिगी जमातच्या 8 कोरोनाग्रस्तांची ट्रॅव्हल हिस्ट्रीमध्ये बीड जिल्ह्यात गेवराई जवळील शहागड चेकपोस्टवर पोलिसांशी हुज्जत घातल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे शहागड, व चौसाळा चेकपोस्टवर तैनात असलेले पोलीस, होमगार्ड, जिल्हा परिषदेचे कर्मचारी मिळून असे 33 जणांचे नमुने घेण्यात आले होते.